अखेर 'त्याविषयी' खा. सुजय विखेंचा माफीनामा
अ-प्राईड वेबन्यूज टीम : उड्डाणपूल होण्यासाठीचे श्रेय दिवंगत अनिलभैय्या राठोड व दिवंगत दिलीप गांधी यांचे पण आहे. या श्रेय नामावली मध्ये माझे नाव सर्वात शेवटी आहे. त्या दिवशी स्व. राठोड यांचे नाव घेण्यास मी विसरलो, असे स्पष्ट करत अखेर याविषयी खा. सुजय विखे यांचा माफीनामा समोर आला आहे. याबाबत मनमोकळे स्पष्टीकरण मंगळवारी बोलताना त्यांनी दिले.
दरम्यान, उड्डाणपुलाचे उद्घाटन १९ नोव्हेंबरलाच जाहीर केल्याप्रमाणे पार पडेल. दुपारी तीन वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
त्यानंतर ओम गार्डन या ठिकाणी मेळावा होईल. संध्याकाळी सात वाजता पुलावरून आतिषबाजी करण्यात येईल, अशी माहिती खाजगी यांनी दिली आहे.
0 Comments