विद्यार्थी काँग्रेसच्या नगर शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी किशोर कांबळेंची निवड
माजी मंत्री थोरातांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, काळेंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत करणार - कांबळे
APN News वेब टीम : अहमदनगर शहर विद्यार्थी काँग्रेस एन.एस.यु.आयच्या जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कांबळे यांना संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विद्यार्थ्यांचे मजबूत संघटन उभे करण्यासाठी आपण काम करत असल्याचे यावेळी बोलताना कांबळे यांनी म्हटले आहे.
यावेळी किरण काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज मुंडे च्या अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदी उपस्थित होते.
कांबळे हे नगर शहरातील विद्यार्थ्यांच्या गटामधून राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील पदयात्रेसाठी बाळापुर ते शेगाव पदयात्रेत काळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन परतीच्या प्रवासात त्यांनी विद्यार्थी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता.
त्यांच्यावर आता पक्षाने विद्यार्थी संघटनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. कांबळे हे त्रिसरण सामाजिक बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली आहेत. करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेषतः नगर शहरातील व तालुक्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवत भरीव काम केले आहे.
कांबळे यांचे निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, माजी आ. मोहन जोशी, पक्ष निरीक्षक वीरेंद्र किराड, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी डॉ. जयश्रीताई थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, विद्यार्थी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष आकाश क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले आहे.
0 Comments