Subscribe Us

Header Ads

काँग्रेस नेते राहुल गांधींवरील कारवाईचे नगर शहरात तीव्र पडसाद... समविचारी पक्षांच्यावतीने सोमवारी नगर शहरात लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन


प्रतिनिधी : देशातील यंत्रणांचा दुरुपयोग करून काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याविरुद्ध देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. २७) नगर शहरामध्ये सकाळी ११.३० वाजता माळीवाडा स्टॅन्ड जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समविचारी पक्ष, संघटना, समूह, गट, चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. 


सोमवारी नगर शहरामध्ये भाजप - आरएसएस विरोधी समविचारी पक्षांच्या वतीने लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनाची बैठक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात रविवारी पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

त्याच्या नियोजनाची बैठक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. कारवाईचे नोटिफिकेशन प्रसिद्ध होताच अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चितळे रोडवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत संसद सचिवालयाच्या नोटिफिकेशनच्या प्रती फाडून पायदळी तुडवत आंदोलन केले होते. त्यानंतर आता शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीयांची वज्रमूठ आवळण्यात आली असून या माध्यमातून सोमवारी समविचारी घटक एकत्रितरित्या सत्याग्रह करणार आहेत. 

जिल्हा वाचनालयात आज पार पडलेल्या बैठकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे किरण काळे, संजय झिंजे, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, प्रवीण गीते, गणेश चव्हाण, शैला लांडे, पुनम वंनंम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. मेहबूब सय्यद, आम आदमी पक्षाचे भरत सकाळ, रवी सातपुते, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, ॲड. विद्या जाधव, सैनिक पक्षाचे ॲड. शिवाजी डमाळे, बामसेफचे शिवाजीराव भोसले, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, चर्मकार समितीचे शिवाजीराव साळवे तसेच बाळासाहेब देशमुख, विजयराव शिंदे, राजू देठे, विशाल केदारी, विजय सौदे आदींसह समविचारी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी अनेकांनी यावेळी आपले परखड मनोगत व्यक्त केले. देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. सामान्य माणूस दैनंदिन प्रश्नांनी त्रस्त आहे. मात्र भाजप, आरएसएसला देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे. त्यांना संविधान मान्य नाही. देशाच्या जनतेचा या भूमिकेला तीव्र विरोध असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी मांडले. तसेच लोकशाही वाचविण्यासाठी नगरमध्ये समविचारी पक्ष, संघटना मोठ्या प्रमाणावर या निमित्ताने एकत्र आल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळाले.

लोकशाही बचाव सत्याग्रहामध्ये भाजप, आरएसएस विरोधी विचाराच्या सर्व समविचारी पक्ष, संघटना, समूह, गट, चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सत्याग्रहाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments