Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : गुणे आयुर्वेद चौकाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चौक नाव देण्याची "या पक्षाच्या नेत्याने" केली मागणी

 

प्रतिनिधी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, साईबाबांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याबागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अपमान केला आहे असे म्हणत, आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गुणे शास्त्री आयुर्वेद चौकाचे नाव बदलून "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चौक" असे नाव द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. संत तुकारामांना छत्रपती शिवाजी महाराज देखील मानायचे. त्यांचा आदर करायचे, असेही काळे यांनी म्हटले आहे. 

शहरातील तथाकथित कार्यसम्राट लोकप्रतिनिधी या भोंदू बाबाला शहरामध्ये दरबार लावण्यासाठी आणण्याच्या प्रयत्नात असून नुकत्याच मुंबईत झालेल्या दरबाराच्या वेळी यासाठी त्यांचे प्रतिनिधी निमंत्रण द्यायला गेले होते, असा आरोप काळेंनी केला आहे. हिंदू धर्मीयांसह अन्य धर्मीयांच्या भावना दुःखविणाऱ्या या भोंदू बाबाला नगरमध्ये आणल्यास काँग्रेस त्यांचा दरबार उधळून लावेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे. 

गुणे चौकाचे नाव संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चौक करण्यासंदर्भात महानगरपालिकेला तसे निवेदन काँग्रेसच्या वतीने दिले जाणार आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील निर्विवाद महान संत आहेत. त्यांच्या नावाला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न करू नये. जे विरोध करतील, अंगावर येतील त्यांना काँग्रेस शिंगावर घेण्याचे काम करेल, असा इशाराही काळेंनी दिला आहे. 

Post a Comment

0 Comments