Subscribe Us

Header Ads

रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या काँग्रेसकडून हिंदू, मुस्लिम बांधवांना शुभेच्छा... राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची ईदच्या कार्यक्रमाकडे पाठ


प्रतिनिधी : आज देशभरामध्ये रमजान ईद आणि अक्षयतृतीया एकत्र साजरी केली जात आहे. हिंदू, मुस्लिम धर्मियांचे सण एकाच दिवशी येणे ही या देशातली विविधतेतील सुंदरता असून हे हिंदू, मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांच्या सामूहिक नमाज पठणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी काळे बोलत होते. राष्ट्रवादीने मात्र ईदगाह मैदाना वरील मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. आमदारांची यावेळी असणारी अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, ज्येष्ठ नेते निजाम जहागीरदार, हाफिज मोहम्मद सय्यद, हनीफ मोहम्मद शेख, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ज्येष्ठ नेते आरिफ शेख, काँग्रेस जिल्हा सचिव अन्वर सय्यद, सचिव मुबीन शेख, ॲड. अश्रफ शेख, पत्रकार वहाब शेख, ॲड. बिलाल शेख, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, सहसचिव राहूल सावंत, सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्ष आर. आर. पाटील आदींसह हिंदू, मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काळे म्हणाले की, शहरात सलोख्याची आणि शांततेची गरज आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम सब है भाई भाई ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सर्व समाजाला, अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. अहमदनगरचा शहा शरीफ दर्ग्याशी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा ऋणानुबंध कायम आहे. हे हिंदू, मुस्लिम ऐक्याचे शहरातील सर्वात मोठे प्रतीक आहे. 

ईद मिलन कार्यक्रमानंतर शिर खुर्म्याचा देखील कार्यक्रम पार पडला. यावेळी देखील हिंदू, मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. हिंदूं बांधवांसाठी अक्षयतृतीया तर मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद हा मोठा सण असतो. यानिमित्ताने धार्मिक सलोख्याच्या संदेश दिला जातो. मात्र मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी शहराच्या आमदारांनी सलोख्याच्या भावनेतुन का होईना यावेळी उपस्थित राहत धार्मिक ऐक्याच्या दृष्टीने शुभेच्छा देणे महत्त्वाचे असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, अशी खंत यावेळी काळे यांनी बोलताना व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments