प्रतिनिधी : युवा नेते चंद्रकांत उजागरे यांची अहमदनगर शहर काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभाग ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या सूचनेवरून अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांची नियुक्ती केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वय तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा उपस्थित होते.
उजागरे यांनी मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी ते शिवसेना मुख्यमंत्री गटाचे शहर जिल्हा उपप्रमुख होते. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्यावर काळे यांनी महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
उजागरे हे अहमदनगर पहिली मंडळी काँग्री डी १८ ह्युम मेमोरियल चर्चचे विश्वस्त आहेत. तसेच अहमदनगरच्या युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीचे ते चेअरमन ही आहेत. त्यांचा ख्रिश्चन, मुस्लिम समाजासह सर्वच समाज बांधवांशी दांडगा संपर्क आहे. प्रभाग ११ मध्ये त्यांनी गत मनपा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत मोठ्या संख्येने मते घेतली होती.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उजागरे म्हणाले की,
धर्मनिरपेक्ष विचार हाच अखंड भारताला एकत्रित ठेवू शकतो. सध्या देशात संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे. नगर शहरातील ख्रिचन, मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटित करण्याचे काम मी करणार आहे. लवकरच शहर ब्लॉक विभागाची कार्यकारणी गठीत केली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
नियुक्ती बद्दल आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन वकफ बोर्डाचे चेअरमन आ. वजाहत मिर्झा, जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आ. चंद्रकांत हांडोरे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य तथा प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री आ. वर्षाताई गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
0 Comments