Subscribe Us

Header Ads

Nagar Politics : नगर शहर महायुतीतील अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात... लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही करेक्ट कार्यक्रम करणार

काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि. क्षेत्रे, युवा आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी घोरपडेंची निवड 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण घोरपडे, उद्योजक पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश... अनेक जण संपर्कात असल्याचा काळेंचा दावा

प्रतिनिधी : शहरात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या "महासंकल्प मेळावा - लक्ष विधानसभेचे" यामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. यावेळी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि.सुजित क्षेत्रे यांची तर काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी गौरव घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे व युवा उद्योजक ओंकार पाटील यांनी आपल्या कार्यकर्ते, समर्थकांसह काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. निलेश लंके, आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, दशरथ शिंदे, सुनील क्षेत्रे, संजय गारुडकर सर, अभिनय गायकवाड,  स्वप्निल पाठक, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, उषा भगत, आशा लांडे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, किशोर कोतकर, चंद्रकांत उजागरे, गणेश चव्हाण, अल्तमश जरीवाला, माजी नगरसेवक फारुख शेख, फैयाज केबलवाले, शम्स खान, शंकर आव्हाड, गणेश आपरे, अशोक शिंदे, कैलास शेवाळे, करण ससाणे, किरण पाटील, सचिन गुजर आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

किरण काळे म्हणाले, 

शहरातील महायुतीतील घटक पक्षांमधील अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी त्यांचे मोठे बळ मिळणार आहे. राजकारणात सर्वच पत्ते ओपन करायचे नसतात. आगामी विधानसभेत शहरातील अनेक कार्यकर्ते विरोधकांच्या व्यासपीठावर दिसतील मात्र ते आत्तापासूनच आमच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. लोकसभेतही हेच झाले होते. विधानसभेलाही करेक्ट कार्यक्रम करणार. शहरात महाविकास आघाडी अभेद्य असून शहरात शतप्रतिशत परिवर्तन होणार आणि नगर बदलणार असा ठाम विश्वास यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केला. 

सुजित क्षेत्रे हे इंजिनियर असून व्यवसायिक आहेत. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यावर काँग्रेसच्या आयटी विभागाची जबाबदारी होती. आता त्यांना बढती देण्यात आली आहे. 

गौरव घोरपडे हे यापूर्वी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनी या माध्यमातून शहरात युवकांचे चांगले संघटन उभे केले म्हणून त्यांच्यावर आता सामाजिक न्याय विभाग युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

शहरात दांडगा जनसंपर्क असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमच्या मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष अरुण घोरपडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.  

तसेच ओंकार पाटील हे प्रभाग क्रमांक चार मधील युवा उद्योजक असून खा. निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी चांगले काम केले होते. त्यांचा शहरातील व्यापारी, उद्योजक यांच्याशी दांडगा संपर्क आहे. 

किरण काळे यांचे शहर विकासाचे व्हिजन आम्हाला भावले. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्याप्रमाणे ते निर्भीडपणे नगर शहराला भयमुक्त करण्याचे काम करत आहेत. म्हणूनच आम्ही काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी घोरपडे व पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments