Subscribe Us

Header Ads

प्राणघातक हल्ल्यानंतर इम्रान खान यांची प्रकृती स्थिर, मात्र मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्धार


अ -प्राईड न्यूज टीम : ‘तहरीक-ए-इन्साफ पार्टी’ने (पीटीआय) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबाद येथे मोर्चा काढला होता. या मोर्चा वेळी खान यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यात खान गंभीर जखमी झाले होते. यावेळी एक मृत्युमुखी पडला असून अन्य सात जणांना गंभीर दुखापत झाली होती.

 या हल्ल्यानंतर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. खान यांच्या जीवितला कोणताही धोका नसून दुखापत गंभीर असल्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने दिला आहे. 

घटनेमुळे मोर्चा थांबवण्यात आला होता. मात्र खान यांनी रुग्णालयातून या हल्ल्यानंतरही मोर्चा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाच्या वतीने याबाबत अधिक माहिती देण्यात आली असून हा मोर्चा शुक्रवारी सकाळीच अकराला वजिराबाद येथून पुढे निघाला असून तो सुरूच राहणार आहे. खान यांनी पाकिस्तानवासीयांना संदेश देताना म्हटले आहे, "की मी झुकणार नाही. पाकिस्तानवासीयांसाठी खरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

दरम्यान, लाहोर येथे इम्रान यांनीच उभारलेल्या शौकत खानम रुग्णालयात इम्रान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालया बाहेर खान यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

Post a Comment

0 Comments