Subscribe Us

Header Ads

"या दोन" बॉलीवूड स्टार्सची यशराज फिल्म मधून एक्झिट, बहुचर्चित "पठाण" फिल्मच्या प्रदर्शनाआधीच YRF ला धक्काअ - प्राईड वेबन्यूज टीम : यशराज फिल्म ही बॉलीवूड मधील जुनी फिल्म प्रोडक्शन संस्था आहे. आजवर या संस्थेने बॉलीवूडला अनेक लोकप्रिय चेहरे दिले आहेत. यशराजची टॅलेंट मॅनेजमेंट विंग यासाठी देशात टॅलेंट हंट करण्याचे काम करत असते. यशराज पुढे आणलेल्या कलाकारांशी त्यांचा करारनामा असतो. 

यशराजच्या करारनाम्या नुसार यशराज फिल्म्स बरोबरच चित्रपट करायचे. करारनाम्यात करारबद्ध असणाऱ्या कलाकारांना यशराज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही निर्मात्यांकडे काम करायचे असल्यास त्यांना यशराज कडून रितसर लेखी परवानगी घ्यावी लागते. 

मात्र आता यशराजच्या या बंधनातून बॉलीवूडमधील दोन मोठे स्टार्स बाहेर पडल्याची बातमी पुढे आली आहे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा या दोघांनीही आता यशराज फिल्मस् मधून एक्झिट घेतली आहे. बहुचर्चित "पठाण" फिल्मच्या प्रदर्शनाआधीच YRF ला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.

यशराजने बॉलीवूडला दिलेल्या लोकप्रिय चेहऱ्यांमध्ये अनुष्का शर्मा, वाणी कपूर, रणवीर सिंग, परिणीती चोप्रासारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

मात्र रणवीर आणि परिणीती यांनी यातून एक्झिट घेतल्यामुळे यशराजच्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ते दिसणार की नाही हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंग दिसणार आहे. त्याचबरोबर आयान मुखर्जीच्या "ब्रह्मास्त्र दोन" मध्ये देखील रणवीरला मुख्य भूमिका साकारताना चाहते पाहू शकणार आहेत. 

मागील चार-पाच वर्षांपासून परिणीती चोप्रा विशेष हिट चित्रपट देऊ शकलेली नाही. मात्र या मोठ्या कालावधीनंतर राजश्री प्रोडक्शनच्या "उंचाई" या चित्रपटातून ती पुन्हा एकदा चाहत्यांना दिसणार आहे.

Post a Comment

0 Comments