पहावे ते नवलच.. उड्डाण पुलावर पहिल्याच दिवशी "यांचे ही" झाले दर्शन...
अ - नगर प्राईड वेब न्यूज टीम : वाहतुकीसाठी खुला झालेल्या नगरच्या बहुचर्चित उड्डाणपूलाने पहिलाच दिवस अनेक घटनांमुळे गाजवला आहे. पहिल्याच दिवसाची उड्डाणपुलावर वादावादी, मारामाऱ्यांनी सुरुवात झाली. एका चार चाकीचा अपघात देखील झाला.
ज्या ट्राफिक जामच्या समस्येवर उपाय म्हणून उड्डाणपूल तयार करण्यात आला तीच समस्या गाडीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यामुळे प्रश्न नेमका सुटला की अधिक जाटील झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कदाचित उड्डाणपूल नवीन असल्याने पहावी एक सफर करून असे अनेकांना वाटल्याने उड्डाणपुलावर झालेली गर्दी ही तात्पुरती असावी. मात्र असेच ट्राफिक जाम नेहमीच होत राहिले तर मात्र नेमके काय चुकले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली नाही म्हणजे बरे, अशी कुजबुज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
"पहावे ते नवलच.." असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. नगरकरांनी उड्डाणपूल पाहण्यासाठी केलेली गर्दी ही समजण्यासारखी आहे. कारण हा शहरातील पहिलाच उड्डाणपूल आहे. जशी नगरकरांना या उड्डाणपुलाची सफर करावी वाटली, तशीच इच्छा म्हशी आणि रेड्यांच्या मनात देखील निर्माण तर झाली नाही ना ? असा प्रश्न मनाला पडावा असे चित्र पहिल्या दिवशी उड्डाणपणावर पाहायला मिळाले.
घडलेही तसेच. काही म्हशी आणि रेड्यांनी देखील उड्डाणपुलाची सफर करण्याचा आनंद पहिल्याच दिवशी लुटला आहे. त्यामुळे आता माणसांबरोबरच प्राण्यांचेही दर्शन उड्डाण पुलावर नगरकरांना झाले आहे. त्याचा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
0 Comments