Subscribe Us

Header Ads

जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप आता भारतातही मिळणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स ही...!

 


जगातील पहिला फोल्डेबल लॅपटॉप आता भारतातही मिळणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स ही...!

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : Asus ने भारतात आपला नवीन लॅपटॉप नुकताच लाँच केला आहे. Asus Zenbook 17 Fold OLED (UX9702) असे त्याचे model name आहे. 

या model मध्ये १७.३ इंचाचा डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा जगातील पहिला फोल्डेबल OLED लॅपटॉप असून या लॅपटॉपमध्ये 12th जनरेशन इंटेल CoreTM i7-1250U processor, मोठी 75whr बॅटरी यासारखे फीचर्स कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. 

काय आहेत लॅपटॉपचे फीचर्स ?

Asus Zenbook 17 Fold OLED (UX9702) Specifications

१) Asus Zenbook 17 Fold OLED लॅपटॉप मध्ये १७.३ इंचाचा (2560 x 1920 पिक्सल) फोल्ड 4:3 आस्पेक्ट रेशियो स्क्रीन दिली आहे. 

२) लॅपटॉप मध्ये ग्लॉसी डिस्प्ले आणि टच स्क्रीन दिली आहे. 

३) स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ८७ टक्के इतका आहे. 

४) आसुसच्या या फोल्डेबल लॅपटॉप मध्ये इंटेल कोर i7-1250U प्रोससेर दिले आहे. 

५) जे १.१ गीगाहर्ट्ज वर काम करते. 

६) यात ग्राफिक्ससाठी इंटेल आयरिस Xe दिले आहे. 

७) Asus Zenbook 17 Fold OLED (UX9702) मध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. 

८) आसुसचा हा लॅपटॉप विंडोज ११ होम प्रो सोबत येतो. 

९) हा लॅपटॉप सॉफ्ट कीबोर्ड आणि 1.4mm च्या ट्रॅव्हलला सपोर्ट करतो. 

१०) या लॅपटॉपमध्ये Windows Hello सपोर्टसाठी IR फंक्शन सोबत ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 

११) आसुसचा हा लॅपटॉप मिलिट्री ग्रेड स्टँडर्ड US MIL-STD 810H सोबत येतो.

किती आहे किंमत ?

Asus Zenbook 17 Fold OLED (UX9702) ची किंमत ३ लाख २९ हजार ९९० रुपये आहे. 

खरेदी कसा करावा ? 

हा लॅपटॉप ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल जसे आसुस ई-शॉप, अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्सवर उपलब्ध आहे. याशिवाय, ब्रँड स्टोर आसुस एक्सक्लूसिव्ह स्टोर, ROG स्टोर आणि सर्व आसुस ऑथराइज्ड डीलर्सकडे हा लॅपटॉप उपलब्ध करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments