Subscribe Us

Header Ads

Health Tips : हार्ट अटॅक १ महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, जाणून घ्या लक्षणे...!

 

Health Tips : हार्ट अटॅक १ महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, जाणून घ्या लक्षणे...!

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : हृदयविकाराचा झटका ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो त्याचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे.  

जगभरातील अभ्यासानुसार दररोज हजारो लोकांचा मृत्यू या भयंकर आजाराने होत आहे. हार्ट अटॅकमुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे.

ही एक अचानक घडणारी घटना आहे. त्यामुळे हार्ट अटॅक कधी येईल ते सांगता येत नाही असे अनेकजण म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का, हार्ट अटॅक येण्यापूर्वी सुद्धा शरीराला काही संकेत मिळतात. सुरुवातीला एक झटका मिळतो आणि तिथूनच हार्ट अटॅकला खरी सुरवात होते. 

नुकतेच ५०० पेक्षा अधिक स्त्रियांवर अभ्यास करत सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एक महिना आधीपासूनच त्याचे संकेत आपले शरीर आपल्याला देऊ लागते. 

काय म्हणते सर्वेक्षण? 

हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीपासूनच तुम्हाला पुढील लक्षणे जाणवू लागली तर आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे. तात्काळ हृदयविकाराशी निगडित वेगवेगळ्या चाचण्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे हे या धोक्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी आवश्यक आहे.

ही लक्षणे दिसल्यास तात्काळ 

डॉक्टरांशी संपर्क करा : 

१) रात्री झोपेत श्वास घेण्यास अडचण वाटणे.

२) हाता पायाला मुंग्या येणे.

३) विस्मरण होणे.

४) झोप न येणे. 

५) छातीवर सतत दबाव जाणवणे. 

६) छातीत अधून मधून कळ येणे. 

७) छातीच्या मागील भागात पाठीत दुखणे. 

८) धाप लागणे. 

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Post a Comment

0 Comments