Subscribe Us

Header Ads

क्रिकेट निवड समितीचा पुढील अध्यक्ष कोण ? भारताच्या या माजी क्रिकेटपटूचे नाव आघाडीवर

क्रिकेट निवड समितीचा पुढील अध्यक्ष कोण ? भारताच्या या माजी क्रिकेटपटूचे नाव आघाडीवर

अ-प्राईड वेब न्यूज टीम : बीसीसीआयने चेतन शर्मा यांची निवड समितीच्या अध्यक्षपदावरून हाकालपट्टी केली आहे. ट्वेंटी २० वर्ल्ड कप मध्ये आलेल्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने या पदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत.

बीसीसीआयच्या या कारवाईनंतर क्रिकेट निवड समितीचा नवीन अध्यक्ष कोण असणार याची चर्चा क्रिकेट प्रेमींमध्ये सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताचा स्टार क्रिकेटर अजित आगरकर हा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 

अजित आगरकर हा महाराष्ट्राचा आहे. त्याने या पदासाठी अर्ज केला आहे. मागील वेळी देखील त्याने अर्ज केला होता. मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. 

यावेळी मात्र त्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

Post a Comment

0 Comments