फुटबॉल विश्वचषकाचा आजपासून रंगणार थरार
अ-प्राईड वेब न्यूज टीम (दोहा) : जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला सर्वाधिक पसंती आहे. क्रिकेट प्रमाणेच फुटबॉलच्या विश्वचषकाची देखील फुटबॉलच्या चाहत्यांना उत्सुकता जगभर लागली आहे. कतारची राजधानी असलेल्या दोहा शहरातून आज संध्याकाळी फुटबॉल विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
गत विजेत्या फ्रांससह यावर्षीच्या विश्वचषकामध्ये एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाची चार अशी एकूण आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभा पूर्वी सलामीच्या सामन्या आधी यजमान कतार आणि Iquador यांच्यात सामना रंगणार आहे.
भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसात वाजता विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
0 Comments