Subscribe Us

Header Ads

"..तर महाविकास आघाडीत फूट पडेल" असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी पुन्हा राहुल गांधींवर साधला निशाणा, म्हणाले...

 "..तर महाविकास आघाडीत फूट पडेल" असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी पुन्हा राहुल गांधींवर साधला निशाणा, म्हणाले... 

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. सुरुवातीच्या काळात या यात्रेविषयी मीडियात फार चर्चा होत नसली तरी देखील शेवटच्या टप्प्यात गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाष्य केल्यानंतर ही यात्रा मात्र चांगलीच चर्चेत आली आहे. 

मात्र राहुल गांधींच्या सावरकर यांच्या वर माफीवीर असल्याच्या केलेल्या टिप्पणीमुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने गांधींवर थेट टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, सावरकरांच्या अर्जांना माफीनामा म्हणता येणार नाही. अशा वादाने भारत जोडो कसे करता येईल ? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. इंग्रजांच्या काळात क्रांतिकारकांचा छळ केला गेला. दहा वर्षांचा तुरुंगवास भोगणे काही सोपी गोष्ट नाही. दहा वर्ष नरक यातना भोगल्यानंतर डावपेचाचा भाग म्हणून सावरकरांनी केलेले अर्ज म्हणजे काही माफीनामा नाही. 

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेबरोबरच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या पदयात्रेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. शरद पवार देखील या यात्रेत सहभागी झालेले नाहीत. 

शिवसेना राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतील नेते जरी या यात्रेत सहभागी झाले असले तरी या दोन्ही प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते मात्र या यात्रेपासून चार हात लांबच राहिले आहेत. 

त्यातच राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक होत शिवसेनेने घेतलेली भूमिका ही आगामी काळात महाविकास आघाडीच्या एकसंधतेवर काही नकारात्मक परिणाम करणार का, हे पहावे लागणार आहे. 

Post a Comment

0 Comments