भाजप नेते नितीन गडकरांनी केले काँग्रेसच्या "या" नेत्याचे जाहीर कौतुक
अ-प्राईड वेबन्यूज टीम : देशात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री समजला जाणाऱ्या भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जाहीर कौतुक केले आहे.
देशात केलेल्या आर्थिक सुधारणांसाठी सिंग यांनी केलेल्या कामाबद्दल आपण त्यांचे ऋणी असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
TIOL च्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात गडकरींनी बोलताना सिंग यांचे कौतुक केले आहे. देशातील गरिबांना आर्थिक धोरणांचा फायदा होण्याची गरज आहे. त्यासाठी अधिक उदारमतवादी आर्थिक धोरणांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशाला दिशा मिळण्यामध्ये उदारमतवादी आर्थिक धोरणांची भूमिका ही महत्त्वाची आहे. ती घेतल्याबद्दल सिंग यांचे आपण ऋणी असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
0 Comments