Subscribe Us

Header Ads

नगरचे बूथ हॉस्पिटलही भारत जोडो यात्रेशी जोडले जाणार

 

बूथ हॉस्पिटलने समाजात मानवतेचा आदर्श निर्माण केला - किरण काळे ; 

भारत जोडो यात्रेनिमित्त काळेंनी साधला संवाद, बूथ हॉस्पिटलही यात्रेशी जोडले जाणार 

अ - नगर प्राईड वेबन्यूज टीम : कोरोनाने जगभर हाहाकार उडवून दिला. आपल्याला अनेक जवळच्या माणसांना या काळात गमवावे लागले. मात्र या संकट काळात नगर शहरातील नागरिकांना बूथ हॉस्पिटलने आधार देण्याचे काम केले. अनेकांचे प्राण वाचवले. या संस्थेने समाजात मानवतेचा नवा आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

भारत जोडो यात्रेनिमित्त काळेंनी बूथ हॉस्पिटल मधील मेडिकल स्टाफ आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.देवदान कळकुंबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. काळे यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेसाठी शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश तयार केला जात आहे. या निमित्ताने बूथ हॉस्पिटल देखिल भारत जोडो यात्रेशी जोडले गेले आहे. 

काळे म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत आणि उभारणीमध्ये सामाजिक, सेवाभावी संस्थांचा देखील मोलाचा वाटा आहे. नगर शहराला याची मोठी परंपरा आहे. बूथ हॉस्पिटल ही शहरातील गोरगरिबांची आधारवड संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. मानवतेची सेवा हा संस्थेच्या सामाजिक कार्याचा मूलाधार आहे. कोरोना काळात हॉस्पिटलच्या स्टाफने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजातील उपेक्षित, गरजू घटकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम धाडसाने केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. नगरकर ही सेवा कधीही विसरू शकणार नाहीत.

हॉस्पिटलच्या वास्तुत सेवा कार्याची मोठी ऊर्जा आहे. संस्था आवारातील माती या कलशाच्या निमित्ताने राहुल गांधींपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. या मातीतली ऊर्जा भारत जोडो यात्रेला आम्ही देणार आहोत. देशातील सर्व घटकांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय यात्रेला निश्चितच ही ऊर्जा बळ देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला. 

डॉ. कळकुंबे म्हणाले की, गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रत्येक माणसात देव आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे. अनेक उपेक्षित, गरजवंत बूथ हॉस्पिटलच्या वैद्यकीय मोफत सेवेचा लाभ दररोज घेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे सेवा कार्य समाजाच्या पाठिंब्याने अविरतपणे सुरू आहे. यावेळी डॉ.कळकुंबे यांनी काळे यांचा बूथ हॉस्पिटलच्या वतीने सत्कार केला. बूथ हॉस्पिटल बरोबरच शहरातील अन्य सामाजिक संस्थांच्या आवारातील देखील माती कलशासाठी संकलित करण्यात येत आहे. 

यावेळी हॉस्पिटलच्या स्टाफसह माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ॲक्टिव्ह मराठीचे उमेशभाऊ साठे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, सावेडी उपनगर अध्यक्ष अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेसचे पै.दीपक जपकर, गौरव घोरपडे, भरत पुंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, महिला काँग्रेसच्या जरीना पठाण, पुनम वनंम, अर्चना पाटोळे, मीना रणसूर, शैलाताई लांडे, अपंग महिला काँग्रेस विभागाच्या शहर समन्वयिका मोमीन सय्यद, अपंग पुरुष काँग्रेस विभाग शहर समन्वयक सोफियान, ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी हनीफ मोहम्मद जहागीरदार, शंकर आव्हाड, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, ज्ञानेश्वर शिरसाट, बापू डोंगरे, सचिन साठे, सौरभ भोसले, काँग्रेस सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष ऋतिक जाधव, विकास घोरपडे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments