Subscribe Us

Header Ads

सत्तांतरानंतर ही माजी मंत्री थोरातांचे नगर शहरात काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत


सत्तांतरानंतर ही माजी मंत्री थोरातांचे नगर शहरात काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे आ. निलेश लंके यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर येथे आले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर थोरात नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली थोरात यांच्या जंगी स्वागतासाठी मोठ्या संख्येने शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला यांनी थोरात यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी 'बाळासाहेब थोरात साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह दणाणून सोडले होत. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. 

राज्यात सत्तांतर झाले असले तरी देखील नगर शहरामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अत्यंत आक्रमकपणे काम करत आहे. माजी मंत्री थोरात हे देखील काळे यांना मोठे राजकीय बळ देत आहेत. त्यामुळेच मंत्री नसताना देखील थोरात यांचे नगर शहरात आगमन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत केलेले स्वागत हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैयाज शेख, मुकुंद नगरचे युवा नेते शम्स खान, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, सावेडी विभागप्रमुख अभिनय गायकवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष अभिनय गायकवाड, साबीरभाई शेख, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, माजी नगरसेविका जरीना पठाण, जेष्ठ महिला नेत्या काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, ओबीसी काँग्रेस विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूनमताई वंनम, महिला सरचिटणीस मिनाज सय्यद, सरचिटणीस अर्चना पाटोळे, काँग्रेस अपंग विभाग शहर जिल्हा समन्वयक सोफियान रंगरेज, संतोष जाधव, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश जाधव, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, बिभीशन चव्हाण, सचिव गणेश आपरे, शंकर जगताप, अल्पसंख्यांक ख्रिश्चन विभागाचे अजय मिसाळ, राजू साळवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments