Subscribe Us

Header Ads

अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे नेते डी. जी. भांबळ काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय... माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी केले स्वागत

अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे नेते डी. जी. भांबळ काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय... माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी केले स्वागत

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे नेते  डी. जी. भांबळ यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केले आहे. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ते राजकीय प्रक्रियेपासून दूर होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या समवेत चर्चा झाल्यानंतर भांबळ पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले आहेत. आ. थोरात यांनी काँग्रेसचा पंचा घालून त्यांचे स्वागत केले आहे.

भांबळ हे मराठी मिशन मंडळ या ख्रिश्चन समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या संस्थेचे सचिव आहेत. या संस्थेच्या क्लेराब्रूसने ख्रिश्चन समाजातील मुला, मुलींसाठी शिक्षणाचे मोठे काम केले आहे. यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.) या जागतिक पातळीवरील ख्रिश्चन संघटनेचे अहमदनगर शाखेचे ते अध्यक्ष आहेत. या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. 

भांबळ यांचा ख्रिश्चन समाजासह शहरातील सर्व धर्मीयांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी अनेक वर्ष अहमदनगर शहर काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. 

किरण काळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक नव्या-जुन्यांना एकत्र करण्याची मोहीम राबवली आहे.भांबळ यांच्या पुन्हा सक्रिय होण्याने नगर शहरातील ख्रिश्चन समाजातील नेतृत्वाला बळ देण्याचे काम काळे यांनी केले आहे.

डी. जी. भांबळ म्हणाले की, ख्रिश्चन समाज हा कायम काँग्रेस विचारधारे बरोबर राहिलेला आहे. देशाच्या संविधानातील सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची वैचारिक प्रगल्भता फक्त काँग्रेस पक्षातच आहे. 

नगर शहरातील ख्रिश्चन समाजाला काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्याचे काम पुढील काळात केले जाईल. तसेच ख्रिश्चन समाजातील युवक, महिला यांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम मी करणार आहे. 

किरण काळे म्हणाले की, भांबळ हे ख्रिश्चन समाजाचे अनुभवी नेते आहेत. त्यांचा नगर शहरासह राज्यात देखील पक्ष बांधणीसाठी उपयोग काँग्रेसला होणार आहे. मराठी मिशन मंडळ, क्लेरा ब्रूसच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. 

काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी असून आगामी काळात त्यांच्यावर काँग्रेस पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी माजी मंत्री आ.थोरात यांच्या माध्यमातून सोपवली जाणार आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, विशाल केदारी, बापू पाडळे, विलास पाटोळे, राजेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments