Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : संजय झिंजे भ्याड हल्ला प्रकरणात सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार

 


चितळे रोडवर सर्वपक्षीय निषेध बैठक संपन्न, भ्याड हल्ल्याचा केला निषेध

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यावर मंगळवारी दुपारी शहराच्या आमदारां समोरच झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणाचे बुधवारी शहरात दिवसभर तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, हॉकर्स युनियन, इतिहास प्रेमी संघटना, कष्टकरी कामगार संघटना यासह विविध पुरोगामी संघटनांच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असणाऱ्या, झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुंड सुरज जाधव आणि टोळीने केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान गुरूवारी (दि. २९) सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची या प्रकरणात समक्ष भेट घेऊन चर्चा करणार आहे


चितळे रोडवरील जुन्या नेहरू मार्केट आवारात ही निषेध बैठक पार पडली. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉ. भैरवनाथ वाकळे, आम आदमी पार्टीचे दिलीप घुले, कामगार संघटनेचे कॉ. मेहबूब सय्यद, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, माजी नगरसेवक संजय जिंजे, इतिहास प्रेमी संघटनेचे आबिद खान, नगरसेवक अमोल येवले, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसने नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष गौरव घोरपडे, भारतीय जनता पार्टीचे बंटी डापसे, आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, विक्रम क्षीरसागर, संपत मोरे, रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, अजय झिंजे, शुभम झिंजे, अनिकेत झिंजे शरद मडूर, राजाभाऊ पोतदार, शोयब सय्यद, शैलेंद्र सांगळे आदींसह शहरातील विविध पुरोगामी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. 

भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शिवसेना युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, बुऱ्हानगर देवस्थान ट्रस्टचे ॲड. अभिषेक भगत हे वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत या भ्याड आल्याचा निषेध नोंदविला आहे. 

यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी झिंजे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तीव्र निंदा केली. शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. गोरगरीब, कष्टकरी, हात गाडीवाले, भाजीवाले अशा समाजातील गोरगरीब घटकांसाठी काम करणाऱ्या झिंजे यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यावर अशाप्रकारे भर रस्त्यात दिवसाढवळ्या गर्दीत हल्ला होणे हे खर तर पोलीस यंत्रणेचे अपयश आहे, अशी टीका यावेळी बोलताना सर्वपक्षीय वक्त्यांनी केली. 


 

Post a Comment

0 Comments