Subscribe Us

Header Ads

आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडून हे आमदारांना अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची इतकी काळजी कशासाठी?


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अहमदनगर जिल्ह्याचे इतकी काळजी असेल तर त्यांनी आपली संपूर्ण विकास निधी या शहराचे व जिल्ह्याच्या विकासा करिता खर्च करावा. या जिल्ह्यात नवीन रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक संस्था आणण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत. ते सोडून नाव बदलण्याचा राजकारण करून जिल्ह्याचा वातावरण खराब करून त्यांचा काय भलं होणार ? आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडून हे आमदारांना अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची इतकी काळजी कशासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे


शेख म्हणाले की, या जिल्ह्याच्या मागून येऊन नाशिक, औरंगाबाद पुढे गेले. हा जिल्हा इतका मोठा असून दळणवळण दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचं मुख्य केंद्रबिंदू असताना एका काळी असं म्हटलं जायचं की देशाचे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना शह देण्याची ताकद या जिल्ह्यातील पुढार्‍यांमध्ये होती. इतकंच नव्हे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं यासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांचे मत विचारात घेतले जायचे. इतकी राजकीय शक्ती असताना सुध्दा आज मागासलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची राज्यात ओळख आहे. 

आज इथले पुढारी फक्त स्वतःच्या संस्था निर्माण करून त्यांनी शिक्षणाची दुकानदारी निर्माण केली आहे. नावाला सार्वजनिक संस्था दाखवून त्यांच्या बाप दादांचीच प्रॉपर्टी समजून संस्था चालवीत आहे. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून राजकारण करत आहे. या जिल्ह्यातील मुलांना रोजगार मिळत नसल्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी जावे लागते. याबाबत कोणत्याही पुढारी यावर आवाज उठवताना दिसत नसल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. 

शेख यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्ह्याचे नाव बदलण्याचा तसा ठराव महानगरपालिकेने करून द्यावा, असे शासन निर्देश आहेत. शासन स्वतःच नियमाच पालन करत नाही. त्याचे कारण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये फक्त मनापला रस्ते मार्गांची नाव बदलण्याचे अधिकार आहे. जिल्ह्याचा नाव बदलण्याचा अधिकार मनापाला नाही. हे माहीत असून देखील कायदेशीर तरतुदीचा अभ्यास न करता काहीही आदेश द्यायचे आणि ठराव करून पाठवा अशी सूचना करायची. हे कितपत कायदेशीर योग्य आहे ?

शासन दरबारी बसलेल्या अधिकाऱ्यांनी तपासलं पाहिजे. त्यानंतरच आदेश देणे अपेक्षित आहे. फक्त बाहेरच्या पुढार्‍यांच्या सांगण्यावरून कार्यवाही करणे उचित नाही. अहमदनगर जिल्ह्यातून बारा विधानसभा सदस्य, दोन विधान परिषद सदस्य निवडून जातात  दोन लोकसभा सदस्य इतके लोकप्रतिनिधी या जिल्ह्यात असताना नाव बदलण्याची ते मागणी करत नाही आणि बाहेरच्या आमदारांनी कारण नसताना बालिशपणाचा कळस दाखवून राजकारण करून जनतेचे पैशातून सुरक्षा घेऊन या जिल्ह्यात ढवळाढवळ करत आहेत. त्यांना इतकीच या जिल्ह्याची चिंता असेल तर त्यांनी सरकारला नगर एमआयडीसी मध्ये बंद पडलेले कंपन्या कोणत्या कारणामुळे बंद पडले? याचा शोध घ्यावा. 

तथाकथित कामगार युनियनयच्या नावाखाली गुंडगिरी चालू आहे. त्याबाबत शासनाचे लक्ष वेधावे. नवीन उद्योग आणण्यासाठी शासनाशी भांडूण नवीन एमआयडीसी आणावी. नगर शहरात चांगले रस्ते होण्यासाठी शासनाकडून निधी आणावा. पाच वर्षाचा आपला संपूर्ण निधी महानगरपालिकेत नवीन रुग्णालय निर्माण करण्यासाठी व उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्याचबरोबर बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी निधी खर्च करावा. हे व विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून शहर विकास आराखडा प्रमाणे विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न करावेत. हे कर्तव्य पार न पडता शहराचा वातावरण खराब करू नये असा सल्ला शाकीर शेख यांनी नामांतराची मागणी करणाऱ्या पुढार्‍यांना दिला आहे. 

Post a Comment

0 Comments