प्रभाग क्रमांक दोन मधील निर्मल नगर रेणावीकर कॉलनी परिसरात पंधरा दिवसापासून नागरिकांचे हाल
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम - प्रभाग क्रमांक दोन मधील निर्मल नगर परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांची हाल होत आहे. गॅस पाईप लाईन व मनपा कर्मचाऱ्यांच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. गॅस पाईपलाईन व महापालिका अंतर्गत विषय असून नागरिकांना यासंदर्भात काही देणे घेणे नाही. तुम्ही आपापसात विषय मार्गी लावून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्याकडे नगरसेवक निखिल वारे व नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केली.
यावेळी शांताबाई काळे, लताबाई खरात, शांताबाई ठोंबरे, सुनीता वनवे, रंजना जाधव, सुनिता लडकन, मुक्ता गीते, स्मिता कुलकर्णी, राधा बडे, राजश्री बागुल, जयश्री अल्हाट, वैशाली कराळे, सीमा साळवे, चंदा कार्ले, जया वाळेकर, साळवे रचना, पतंगे प्रिया, गार्डे मंगल, पालवे मंदा, दीक्षित वर्षा, टकले सुनिता, पवार भाग्यश्री, वाकोडे हेमा, गवळी रेश्मा आदीसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराची मुजोरी
महापालिका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपत येत असल्यामुळे नागरिकांच्या घरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जात नाही. वारंवार ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करूनही दहा, दहा दिवस घंटागाडी येत नाही. तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी उपयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे.
0 Comments