Subscribe Us

Header Ads

शैक्षणिक : अशोकभाऊ फिरोदिया शाळेतील इय्यता चौथीतील विद्यार्थी शेख हमजा कासम ऑलिम्पियाड परिक्षेत गोल्ड मेडल प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर १०८३ वा क्रमांक मिळुन शाळेत सर्वात प्रथम


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : येथील ए.इ.एस. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम शाळेचा इय्यता चौथीचा विद्यार्थी शेख हमजा कासम याने नुकतेच गुरगाव, दिल्ली येथील सायन्स ऑलिम्पियाड फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या जनरल नॉलेज ऑल्मिपियाड परिक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर १०८३ वा क्रमांक मिळुन राज्यात ७८६ तर जिल्हा पातळीवर ५२३ वा क्रमांक मिळुन शाळेत सर्वात प्रथम येण्याचे बहुमान मिळवला आहे. नुकतेच हमजा शेख यांस गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) प्रदान करण्यात आले आहे. 

या यशाबद्दल अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम शाळेचे मुख्याध्यापक भाबड, मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका अदिती कोकाटे, ऑल्मिपियाड शिक्षीका साईलकर, सबीना हसन शेख यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले.

तसेच शाळेचे प्रमुख नरेंद्र फिरोदिया, सायन्स ऑल्मिपियाड फौंडेशन दिल्लीचे चेअरमन डॉ.नरेंद्रा विरमानी, फौंऊडर डायरेक्ट महाबीर सिंग, अहमदनगर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष नईम सरदार, सचिव इंजिनिअर इम्रान हाजी अन्वर खान (पत्रकार), पै.मोसिम शेख, पै.हमज़ा चिडिवाले यांनी हमजा कासम शेख यांचे या यशाबद्दल विशेष कौतुक केले. हमजा शेख हा पाचपीर चावडी येथील कासम शेख यांचा मुलगा असुन विविध क्षेत्रातुन त्याचे या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments