Subscribe Us

Header Ads

काँग्रेस नेते किरण काळे, शिवसेना नेते विक्रम अनिलभैय्या राठोड, भाजप नेते सुवेंद्र दिलीप गांधी, शिवसेना शिंदे गटाचे नेते दिलीप सातपुते यांनी शिवजयंती मिरवणुकीत धरला लेझीमवर ठेका...


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : अहमदनगर शहरात शिवजयंती मिरवणुका उत्साहात संपन्न झाल्या. मात्र मिरवणुकीत चर्चा झाली ती काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या युवा नेत्यांच्या एकत्र येण्याची. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवा सेनेचे राज्यसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड आणि भाजपाचे युवा नेते सुवेंद्र दिलीप गांधी यांनी चितळ रोडवरील शिवालया समोर भव्य शिवजयंती मिरवणुकीत लेझीमवर ठेका धरला. हे तीनही युवा नेते एकत्र आल्यामुळे याची चांगलीच चर्चा शहराच्या बाजारपेठेत सकाळी पाहायला मिळाली. यावेळी बाजारपेठेतील वातावरण भगवेमय झाले होते.

यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे जेष्ठ नेते वसंत लोढा, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला आदींसह शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीत विविध शाळा, महाविद्यालय यांच्यासह संघटना पक्ष यांचे देखावे सहभागी झाले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळा, महाविद्यालयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे सादरीकरण केले. नगरकरांनी त्याला भरभरून दाद दिली. चौका चौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. 

Post a Comment

0 Comments