बजरंग दलाचे शहर संयाेजक कुणाल भंडारी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना शहरातील रामवाडी परिसरात घडली. शहरात सोमवारी रात्री बजरंग दलाचे शहर संयाेजक कुणाल भंडारी आणि अशोक लोंढे यांच्यावर शहरातील रामवाडी परिसरात प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला अज्ञात हल्लेखोरांनी केला. या हल्ल्यात कुणाल भंडारी हे जखमी झाले आहेत.
त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांचा शाेध घेण्यास प्रारंभ केला.अशोक लोंढे आणि त्याचा भाऊ रस्त्यावरून जात असताना काही तरुणांनी त्यांना कट मारल्याने वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर चांगलेच हाणामारीत झाले. यामध्ये अशोक लोंढे यांच्या डोक्यामध्ये धारदार शास्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
या दरम्यान त्या ठिकाणावरून जात असताना बजरंगाचे शहर संयोजक कुणाल भंडारी हे गर्दी पाहून थांबल्यानंतर त्या गर्दी मधील एका टोळक्याने कुणाल भंडारी यांना सुद्धा धार्मिक स्थळावर चादर चढवणारा हाच तो मुलगा आहे असे म्हणून त्यांच्यावरही हल्ला करून धारदार शास्त्राने जखमी केले.
रात्री हल्ल्याची घटना समजताच शहरातील विविध पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दवाखाना आणि तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पाेलिसांनी घटना समजताच शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला होता.तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी कुणाल भंडारी आणि अशोक लोंढे यांच्या भावाच्या फिर्यादी नुसार खुनाचा प्रयत्न करणे आणि अट्रोसीटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments