काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार
प्रतिनिधी : सध्या देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ युवक उभे राहताना पाहायला मिळत आहे. आता यामध्ये नगर तालुका व शहरातील युवकांनी पुढे येऊन "वुई सपोर्ट राहुल गांधी" म्हणत युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगर तालुकाध्यक्ष अरुण संपतराव मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दिवंगत जिल्हा परिषद सदस्या शारदाताई भिंगारदिवे यांचे पुतणे दरेवाडीचे विकास भिंगारदिवे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, नगर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव मस्के, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब सय्यद, जिल्हा सरचिटणीस मनसुख संचेती, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, ओबीसी काँग्रेस राष्ट्रीय सहसमन्वयक मंगलताई भुजबळ, जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष लोंढे, जरीना पठाण, पुनम वनंम, शैलाताई लांडे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष नाथा अल्हाट, सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्ष आर. आर. पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेससह समविचारी पक्षांच्या वतीने नगरमध्ये 'लोकशाही बचाव सत्याग्रहाचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका, शहरातील युवक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.
युवकांची देशातील वाढती बेरोजगारी, जातीय, धार्मिक द्वेष निर्माण करून त्यातून त्यांना भरकटविण्यासाठी सुरू असणारे जातीवादी पक्षांचे प्रयत्न, गुजरातने महाराष्ट्राचे पळवलेले उद्योग, रोजगार याचा यावेळी निषेध करत युवकांनी प्रवेश केला.
यावेळी भिंगारदिवेंसह, मयुर भिंगारदिवे, राहूल चाबुकस्वार, आकाश डहाणे, प्रदिप डहाणे, संदेश शिरसाठ, अक्षय गायकवाड, सनी भिंगारदिवे, विकी भिंगारदिवे, सिद्धांत भिगारदिवे, करण भिंगारदिवे, रजनी गरुड, सिद्धांत कांबळे, पुष्कर भिंगारदिवे, भारत केदारे, आभिषेक नेटके,
सागर चाबुकस्वार, सचिन मगर, अयुब सय्यद, विकास साळवे, गणेश भिंगारदिवे, गणेश साळवे, संदिप राठोड, तेजस कराळे, साहील घोडके, आजय भालेकर, आवेज बागवान, नविन भिगारदिवे, धिरज घोडके, पुष्कर भिंगारदिवे, श्रेयश भिंगारदिवे, नयन चाबुकस्वार, बालवीर चाबुकस्वार, सागर अम्रीत आदींनी प्रवेश केला.
0 Comments