Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : "यांचा" काँग्रेसमध्ये माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश..

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे नेते स्व. हनीफ जरीवाला यांचे पुतणे, सामाजिक कार्यकर्ते अलतमश जरिवाला, ख्रिश्चन समाजाचे रमेश देठे यांनी  अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेसचा झेंडा स्वीकारत आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने जाहीर पक्ष प्रवेश केला. 

या प्रवेशांसाठी अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ज्येष्ठ नेते डी. जी. भांबळ यांनी पुढाकार घेतला. यावेळी आमदार लहू कानडे यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर जिल्हा काँग्रेस व किरण काळे यांचे जनसंपर्क कार्यालय असणाऱ्या चितळे रोड येथील "शिवनेरी" मध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. 

प्रवेशानंतर जरीवाला म्हणाले की, नगर शहरात किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बांधणीचे काम मी आणि माझे सहकारी करणार आहोत. मुस्लिम समाजासह सर्व समाज बांधवांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत. 

रमेश देठे म्हणाले की, अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाज हा सुरुवातीपासूनच काँग्रेस विचारधारे बरोबर राहिलेला आहे. नगर शहरात काळे यांच्या रूपाने समाजाला आश्वासक नेतृत्व मिळाले आहे. समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करण्यासाठी आगामी काळात माझा प्रयत्न असणार आहे. 

Post a Comment

0 Comments