Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग बातमी : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अमर रहे, अमर रहे.. अनिलभैय्या अमर रहेच्या घोषणांनी दणाणला परिसर....

 

मनपाच्या जुन्या कार्यालयास दिले जननायक स्व.अनिलभैय्या राठोड नाव

प्रतिनिधी : जुन्या मनपा कार्यालय आवारात शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा पूर्णाकृती पुतळा उभारत कार्यालयास जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन नाव देण्याची मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या महासभेत याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. ठराव झाला नाही. त्याचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली जून्या महानगरपालिकेच्या भिंतींवर स्व. अनिलभैय्या यांचे फोटो चिटकवत त्यांचे नाव देऊन नामकरण केले. यावेळी अमर रहे, अमर रहे, अनिलभैय्या अमर रहेच्या घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. 

बुधवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्ते अचानक मोठ्या संख्येने जुन्या मनपा आवारात दाखल झाले. यावेळी मनपाचे नामकरण करण्यात आले. मार्च महिन्यात काँग्रेसने शहराचे आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख (ठाकरे गट) संभाजी कदम, मनपा स्थायी समिती सभापती यांना लेखी निवेदन देत पुतळा बसविणे व नामकरण करण्याची लेखी मागणी केली होती. शिवसेनेचा महापौर असून सत्ता शिवसेना, राष्ट्रवादीची आहे. त्यात शिवसेना नगरसेवकांची संख्या जास्त आहे. अनेक वर्ष शहरात शिवसेना-भाजप युती राहिली आहे. त्यामुळे ही मागणी एकमुखी तात्काळ मान्य होईल. अनिलभैय्या यांचा विषय असल्यामुळे शिवसेना कॉग्रेसची मागणी डावलणार नाही अशी काँग्रेसला आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. विशेष म्हणजे असा ठराव करण्याचा विषयच मागील दोन्ही महासभा विषय पत्रिकांवर घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. 

त्यामुळे काँग्रेसने आक्रमक होत महासभा ठरावाची प्रतीक्षा न करता थेट नामकरणच करून टाकले आहे. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, सिद्धीबागे जवळील बंद पडलेल्या जलतरण तलावाला स्व. अनिलभैय्यांचे नाव देण्याचा खोडसळ प्रकार मनपाने केला आहे. स्व. अनिलभैय्या हे या शहरातील लाखो लोकांच्या मनातले ताईत होते. त्यांनी हयात भर या शहरातल्या सर्व घटकांची सेवा केली. दैदिप्यमान काम असणाऱ्या जननायक अनिलभैय्यांचे नाव एका बंद पडलेल्या अत्यंत छोट्या तलावाला देणे हे संतापजनक आहे. 

बंद पडलेला जलतरण तलाव.

नगरकरांना हे रुचलेले नाही. शिवसैनिकांना तर हे कदापी पसंत पडलेले नाही. काँग्रेस या प्रकाराची निंदा करत आहे. स्व. अनिलभैय्यांचा पुतळा आणि मनपाला नाव देणे हे काँग्रेसचे स्वप्न आहे. स्व. अनिलभैय्यांच्या आशीर्वादाने ते आम्ही पूर्ण करणारच असा दृढ निश्चय यावेळी काळे यांनी व्यक्त केला. 

महासभे दिवशी मनपात मारणार ठिय्या 

काळे म्हणाले, आगामी मनपा महासभेत सभागृहात या दोन्ही विषयांना अधिकृतरित्या मान्यता दिली गेली पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सर्व संबंधितांना स्मरणपत्र काँग्रेस पाठवणार आहे. तसेच महासभेत जर हा विषय मंजूर होत नसेल तर त्याचवेळी सभागृहाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते, स्व. अनिलभैय्या राठोड प्रेमी, सामान्य नगरकर यांच्यासह मनपा महासभेत मागणी मंजूर करण्यात यावी, यासाठी काँग्रेस ठिय्या आंदोलन करणार असल्याचे काळे यांनी जाहीर केले आहे. दिवंगत शिवसेना नेत्याच्या पुतळा आणि नामकरण मागणीसाठी शिवसेने चा पुढाकार अपेक्षित होता. ठाकरे गटासह शिंदे गटाच्या देखील पदाधिकारी, नगरसेवकांनी याबाबत चुप्पी साधली आहे. मात्र काँग्रेसने यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. 


यात कुणी राजकारण करू नये 

आजवर जुन्या मनपाच्या नामकरण आणि आवारात पुतळ्यापासून संदर्भात अन्य कुणीही इतर विषय मांडत मागणी केलेली नाही. मात्र या विषयाला विरोध करायचा म्हणून काही लोकांना पुढे करत अन्य नाव व अन्य पुतळा बसवा अशी मागणी करण्याचा घाट काही लोक घालत आहेत. कुणीही विनाकारण यात राजकारण आणू नये, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. 

यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, उषाताई भगत, राणीताई पंडित, जरीना पठाण, पूनमताई वनंम, अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, रतीलाल भंडारी, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, विकास भिंगारदिवे, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, बापू जपकर, गौरव घोरपडे, प्रवीण गीते, आर. आर. पाटील, कल्पना खराडे, मुक्ता डहाळे, सविता कपिले, सोफियान रंगरेज, मिनाज सय्यद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments