नगर शहरातील संतापजनक प्रकार... प्रोफेसर चौकात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौथरा भूमिपूजन कार्यक्रमानंतर घडले असे काही.... त्यामूळे सोशल मीडियातून व्यक्त होत आहे तीव्र संताप....
प्रतिनिधि : सावेडीतील प्रोफेसर चौकात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन जयंतीदिनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमा नंतर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमा असणारे फ्लेक्स रस्त्यावर अस्ताव्यस्त, आडवे तिडवे पडले आहेत.
त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमांमधून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार जनतेसमोर आणला आहे. भांबरकर यांनी याचा निषेध केला आहे. सोशल मीडियातून हिंदू संघटनांच्या वतीने देखील या संतापजनक प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे.
फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=219681704155790&id=100001740086493&mibextid=Nif5oz
0 Comments