सलीमभाई जरीवाला युवा मंच, पिरशाहखुंट यंग पार्टी व मित्र परिवारा तर्फे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीम जरीवाला यांनी कायम गरजवंतांना मदत करण्याचे काम केले. अडी अडचणीत लोकांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळेच त्यांना समाजातील प्रत्येक घटकांकडून प्रेम मिळाले. समाजातील सर्व घटकांची आयुष्यभर त्यांनी सेवा केली आहे. त्यांनी त्यांच्या चांगुलपणातून शहरभर मोठा मित्र परिवार जमवला असून त्यांचा समाजसेवेचा यज्ञ असाच अविरहतपणे सुरू राहण्यासाठी त्यांना कायम बळ मिळत राहो, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीम जरिवाला यांचे अभिष्टचिंतन करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, ॲड. अश्रफ शेख, युवा नेते शम्स खान आदी.
जरीवाला यांच्या वाढदिवसानिमित्त पिरशाहखुंट चौक येथे सलीमभाई जरीवाला युवा मंच, पिरशाहखुंट यंग पार्टी व मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, ॲड. अश्रफ शेख, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, युवा नेते शम्स खान, हाजी रियाज तांबोळी, हाजी जावेद कुरेशी, गुल्लुभाई शेख, राजूभाई अड्डेवाले, हाजी गयाज़ कुरैशी, सय्यद शहा फैसल, फैजान शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
किरण काळे म्हणाले,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनसेवक सलीमभाई जरीवाला आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय हनिफभाई जरीवाला यांचा सामाजिक कार्याचा वसा अलतमश जरीवाला पुढे नेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणाबरोबरच समाजकारणाच्या माध्यमातून प्रभागासह शहरातील नागरिकांच्या सेवेचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. विचारांची शिदोरी ही मनुष्याला आयुष्यात समाजासाठी सत्कर्म करत पुढे जाण्याचा योग्य मार्ग दाखवत असते. जनसेवेच्या विचारांचा वसा अलतमश हे निश्चितपणे यशस्वीरित्या पुढे नेतील असा मला विश्वास आहे.
यावेळी अजहर शेख, जब्बारभाई कुरेशी, दिलावार शेख, खलील सय्यद, शहानवाज शेख, फयाज़ तांबोळी, मोहसीन शेख, आदिल कुरेशी, रहीम शेख, महम्मद कुरैशी, फरान खान, शहबाज कुरेशी, रिज़वान जरीवाला, अफ़रोज़ सय्यद, मुसद्दीक मेमन, वाहीद शेख, नदीम बागवान, मोईन कुरेशी, शोएब बागवान, शाहरुख शेख, मुजीब मनसूरी, फज़ल कराचीवाला, आवेज शेख, शाहरुख बागवान, आजम बागवान, अज्जू शेख, तौसीफ़ पटेल, रियाज मंसुरी, दिशान मोमिन, इमरान बागवान, आदिल शेख, अरबाज बागवान, मोबीन सय्यद, वसीम शेख, शहीद मनसूरी, अजहर बागवान, इमरान शेख, उबेद पिंजारी, असीम शेख, तौसीफ बागवान, ईसाक बागवान, करीम शेख, रेहान बागवान, आबिद शेख, सकलेन कुरैशी, अरशद तांबोली, असीम कुरैशी, मोहम्मद सय्यद, आतिफ सय्यद, अहमद सय्यद, मोहम्मद हूर, मोहम्मद नूर, अलहान जरीवाला आदींसह जरीवाला यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments