Subscribe Us

Header Ads

किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली - माजी मंत्री बाळासाहेब थोरात


काँग्रेस केडगाव विभाग प्रमुखपदी उबाळे, ग्रंथालय शहर जिल्हाध्यक्षपदी लांडगे तर सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्षपदी पाटील, सुनील भिंगारदिवे यांचा कामगारांसह पक्षप्रवेश

प्रतिनिधी : नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजकारण केले पाहिजे. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात याच विचारातून काम सुरू आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आले असता कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

राजस्थान मधील सुप्रसिद्ध अजमेरच्या हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ दर्ग्याचे मुजावर तथा सुफी संत राशिद चिस्ती यांनी यावेळी आ.थोरात यांची सदिच्छा भेट घेत अजमेर दर्गा येथील मानाची दस्तार थोरात यांना बांधून त्यांना व काँग्रेस पक्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी थोरात यांनी देखील त्यांचा सत्कार करत सन्मान केला. 

अजमेरच्या हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ दर्ग्याचे मुजावर तथा सुफी संत राशिद चिस्ती यांनी अजमेर दर्गा येथील मानाची दस्तार बांधून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा सन्मान केला. समवेत शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे, अनिस चुडीवाला, अलतमश जरीवला. 

नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या विलास उबाळे यांच्यावर शहरातील महत्त्वाचे उपनगर समजले जाणाऱ्या केडगावच्या विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसे नियुक्तीपत्र थोरात यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. 

केडगाव काँग्रेस विभागप्रमुख पदाचे नियुक्तीपत्र विलास उबाळे यांना प्रदान करताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात.  

काँग्रेसने स्वतंत्र ग्रंथालय विभाग कार्यान्वित केला असून शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुनील लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

ग्रंथालय विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना सुनील लांडगे. 

विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आकाश कदम तर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. 

नगर शहर सोशल मीडिया ब्लॉक अध्यक्ष पदाचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना आर. आर. पाटील. 

यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार नेते सुनील भिंगारदिवे यांनी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये कामगारांसह मोठ्या संख्येने प्रवेश केला. 

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये कामगारांसह प्रवेश करताना सुनील भिंगारदिवे. 

अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वीकारताना आकाश कदम. 

यावेळी किरण काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अलतमश जरीवाला, राजूभाई जहागीरदार, निजाम जहागीरदार, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. पवन भिंगारदिवे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, आनंद जवंजाळ, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, अभिनव गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, अजय मिसाळ, हनीफ मोहम्मद जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, मोहन वाखुरे, विकास भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, गौरव घोरपडे, बाबासाहेब वैरागर, प्रकाश कोळपे, राजेंद्र तरटे, देवराम शिंदे, हाफिज सय्यद, हमरोज शेख, सोफियान रंगरेज, राहुल चाबुकस्वार, अजय भालेराव, करण अवचारे, अनंत तागड, प्रेम वाघमारे, आदेश साठे, श्रेयस बनसोडे, आदित्य खंडागळे, गौरव उजागरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments