Subscribe Us

Header Ads

माजी खा. हुसेन दलवाईंचे शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने स्वागत


प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई नगर शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे अहमदनगर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी स्वागत केले. यावेळी शासकीय विश्रामगृहावर अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, निजामभाई जहागीरदार, हनिफ मोहम्मद शेख, हाफिज सय्यद, समीर शेख, पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शेख आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अल्पसंख्यांक विभागाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा दलवाई यांनी घेतला. 

मार्गदर्शन करताना खा.दलवाई म्हणाले की, अहमदनगर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत पुढे नेण्याचे काम सातत्याने करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्व समाजांना एकत्र करत प्रेमाचा संदेश दिला आहे. नगर शहरात देखील काँग्रेस कार्यकर्ते सर्व समाज घटकांना बरोबर घेत पुढे जात असल्याचे यावेळी ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments