Subscribe Us

Header Ads

मोठी बातमी : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात...


रस्ते घोटाळा प्रकरणी आत्मदहन करण्यापूर्वीच किरण काळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात 

पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई, मनपाच्या ठोस लेखी आश्वासनानंतर काँग्रेसकडून स्थगितीची घोषणा

प्रतिनिधी : मनपातील रु. २०० कोटींच्या रस्ते घोटाळ्यातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. तरी देखील कारवाई न झाल्याने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या १ जून रोजीच्या (गुरुवारी) जयंतीदिनी जिल्हाधिकारी यांच्या दालना समोर आत्मदहन करणार असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री उशिरा काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक सुरू असतानाच तोफखाना पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर किरण काळे यांनी १ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या संदर्भात काळे यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सुरू असताना पोलिसांनी काळेंना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी काळेंशी चर्चा करताना एपीआय रणदिवे यांच्यासह पोलिस पथक.

ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. 'क्षितिज' बंगल्यावर सुरू असणाऱ्या बैठकीत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक अध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक संजय झिंजे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, मनसुख संचेती, युवक अध्यक्ष प्रवीण गीते, इंजि. सुजित क्षेत्रे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, कामगार नेते विलास उबाळे, युवक उपाध्यक्ष आकाश अल्हाट, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, सरचिटणीस अभिनय गायकवाड, सावेडी विभाग प्रमुख अशोक शिंदे आदींसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

किरण काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनला नेले. 

यावेळी पोलिसांनी काळे यांना आत्मदहन आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे शेवटी पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशनला नेले. दुपारी मनपात उपायुक्तांच्या दालनात झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली होती. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मध्यस्थी करत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तोही प्रयत्न निष्फळ ठरला. रात्री काळेंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मनपा उपायुक्त तथा या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कुऱ्हे, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांना पाचारण करत पोलीस स्टेशनमध्ये काळे व मनपा अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चा घडवून आणली. यावेळी काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी किरण काळे व मनपा अधिकाऱ्यांमध्ये आपल्या दालनात सकारात्मक चर्चा घडवून आणली. 

शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. जनतेच्या पैशांची लूट झाली आहे. रस्ते चार महिन्यात गायब होत आहेत. काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. भ्रष्टाचार करत अनागोंदी सुरू आहे, असे म्हणत काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी चौंडीला गेलेल्या आयुक्त पंकज जावळे यांना उपायुक्त कुऱ्हे यांनी काळे यांचे म्हणणे कळवले. 

त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेने ठोस लेखी आश्वासन देत बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणी दोषींवर दीड महिन्यांच्या आत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच तांत्रिक बाबींबाबत बनावट कागदपत्रांच्या कामांचे सक्षम तांत्रिक प्राधिकरणाकडून चौकशी करून चौकशी अंति निकृष्ट कामे करणाऱ्या दोषींवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठोस लेखी आश्वासन दिले. 

मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या मान्यतेने उपायुक्त कुऱ्हे यांनी ठोस लेखी आश्वासनाचे पत्र किरण काळे यांना सुपूर्द केल्यानंतर आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याची काँग्रेसने घोषणा केली.

त्यानंतर काळे यांनी सामंजस्याची भूमिका घेत आत्मदहन आंदोलन स्थगित करत असल्याची काँग्रेसच्या वतीने घोषणा केली. मात्र लेखी आश्वासनाची पूर्तता न केली गेल्यास पुन्हा आत्मदहन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी मनपा प्रशासनाला दिला. 

दरम्यान, काळे यांच्या इशारामुळे मनपा व पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने काळे यांची समजूत काढण्यासाठी सातत्याने स्थानिक पोलीस यंत्रणेशी पाठपुरावा सुरू होता. शेवटी काळे यांनी मनपाच्या लेखी आश्वासनानंतर पोलिसांना आपण आंदोलन स्थगित करत असल्याचे लेखी दिल्यानंतर प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.


Post a Comment

0 Comments