शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आमदार संग्राम जगतापांचे भरभरून कौतुक
प्रतिनीधी : शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा काँग्रेस कडून भांडाफोड सुरू आहे. यात रोज नवनवीन प्रताप समोर येत आहेत. मात्र शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये अमेरिकन टेक्नॉलॉजीचा वापर करत पुढील १०० वर्ष टिकेल असा जागतिक दर्जाचा रस्ता करण्यात आल्याचा दावा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
हा रस्ता व्हावा यासाठी स्वतः आमदारांचा विशेष पुढाकार होता. विशेष म्हणजे या प्रभागात चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून यातील एक नगरसेविका या आमदारांच्या सुविज्ञ पत्नी आहेत. या अनोख्या कार्याबद्दल किरण काळे यांनी आमदार जगताप यांचे भरभरून कौतुक केले आहे. यामुळे नगरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शहराच्या आमदारांच्या प्रभागात अनोखे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरत तयार करण्यात आलेल्या रस्त्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे पाहणी करत फेसबुक लाईव्ह द्वारे नागरिकांना याची माहिती दिली.
यावेळी फेसबुक लाईव्हद्वारे हे तंत्रज्ञान नगरकरांना दाखवण्यात आले. सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा रस्ता दाखवणारा व त्याची माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
🛴 ठिकाण - #प्रभाग क्रमांक 14 : बुरुडगाव रोड लगतचा आयटीआय कॉलेज गेट (AK1 सोसायटी सामोर) ते भोसले आखाडा रस्ता
दरम्यान काळे म्हणाले की,
हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या परिसरातील सुजाण नागरिकांनी मला फोनद्वारे ही माहिती दिली. मात्र त्यांनी त्यांचं नाव उघड होऊ नये अशी विनंती केली. त्यांच्या बोलण्यात भीती जाणवत होती. नगर शहरात दहशत आहे. नागरिकांना चुकीच्या गोष्टींबद्दल तक्रार करताना सुद्धा भीती वाटते. माझे नगरकरांना अवाहन आहे, नगरकरांनी बोलते झाले पाहिजे. देशात कायद्याचे राज्य आहे. आपण घाबरतो म्हणून घाबरवणारे दहशत करतात. तुमचे नाव गुपीत ठेवले जाईल. तुम्हाला काँग्रेस पूर्ण संरक्षण देईल. मात्र भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याच्या या जनआंदोलनात नागरिकांनी असेच धाडसी बनत सहभागी व्हावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.
0 Comments