मागासवर्गीय समाज बांधवांना काँग्रेसच न्याय देऊ शकते : कविराज संघोलीया
शहर काँग्रेस अनुसूचित विभागाची बैठक संपन्न, महिला कार्यकारीणीच्या निवडी जाहीर
प्रतिनिधी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान तोडून मनुस्मृतिवादी विचार जोपासण्याचे काम देशात सध्या सुरू आहे. अशा वेळी मागासवर्गीय समाज बांधवांना केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा विभागाचे शहर निरीक्षक कविराज संघलिया यांनी केले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट यांच्या पुढाकारातून जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा विभागाचे नगर शहर निरीक्षक कविराज संघलिया यांचे विभागाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट. यावेळी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, विभागाच्या महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई भिंगारदिवे, शहर उपाध्यक्ष रेखाताई आरोळे, मंदाताई ठोकळ, अश्विनीताई गायकवाड, सिमाताई गायकवाड, सहसचिव सुभाष थोरात, संघटक दत्ता भालेराव, कार्याध्यक्ष प्रताप थोरात, सचिव प्रशांत भिंगारदिवे, शहर उपाध्यक्ष संतोष जगताप, नंदु वाकडे, संजय देवडे, कुशिनाथ भिंगारदिवे, श्रीकांत देठे, सुनिल उणवने आदींसह विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कविराज संघलिया म्हणाले की,
मागासवर्गीय समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्याचे काम मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकीय पक्षांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेतृत्व केलेले आहे. काँग्रेसने जो न्याय समाज बांधवांना आजवर दिला तो अन्य कोणताही पक्ष देऊ शकलेला नाही. त्यामुळेच आता आगामी लोकसभा, विधानसभा तसेच शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये समाज काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा करण्यासाठी शहराहतील विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी काम करावे.
किरण काळे म्हणाले की,
नगर शहरात अनुसूचित जाती, मागासवर्गीय समाजातील बांधव मोठ्या संख्येने काँग्रेस विचाराला मानणारे आहेत. नाथा आल्हाट यांनी शहरामध्ये समाजाच्या तसेच आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या युवक, महिला, जेष्ठांचे उत्तम संघटन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले आहे. समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने त्यांचे काम सुरू असते. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आल्हाट यांचे हात पुढील काळात अधिक बळकट केले जातील. तसेच समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी व्यक्तिशः कायम समाजाबरोबर असल्याचे काळे यावेळी म्हणाले.
नाथा आल्हाट म्हणाले की,
आंबेडकरी चळवळीने देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. नगर शहरातील चळवळीत काम करणारे समाजबांधव काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली मोठ्या संख्येने संघटित झाले आहेत. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे, निरीक्षक कविराज संघलिया यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात शहरात नवीन युवा नेतृत्वाला पदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस हाच देशापुढील सक्षम पर्याय आहे.
पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
यावेळी अनुसूचित जाती शहर काँग्रेस विभागाच्या महिला शहराध्यक्षपदी सोनालीताई कांबळे, शहर कार्याध्यक्षपदी मनिषाताई गायकवाड, शहर संघटकपदी दिपालीताई गंगावणे, शहर उपाध्यक्षपदी विशाल आल्हाट यांची नियुक्ती करत निरीक्षक संघलिया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
0 Comments