Subscribe Us

Header Ads

ब्रेकिंग : "भावी खासदार साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है"...कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


 "भावी खासदार बाळासाहेब थोरात आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है"... काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात नगर दक्षिणेच्या दौऱ्यावर

शहर काँग्रेसकडून जोरदार स्वागत, नगर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद, श्रीगोंद्यात कार्यक्रमांना उपस्थिती 

प्रतिनिधी : माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळीच नगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली थोरातांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी "भावी खासदार बाळासाहेब थोरात आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

माथाडी काँग्रेस कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, माथाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी यावेळी थोरातांची भेट घेत नगर दक्षिणेतून थोरात यांनी स्वतः उमेदवारी करावी व नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेत किरण काळे यांना उमेदवार करावे यासाठी कामगारांच्या वतीने आग्रह धरला. यावेळी किरण काळे यांच्यासह ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, विजयराव शिंदे, जयराम आखाडे, आकाश भोस, अमर डाके, राधेश भालेराव, गोरख जाधव, दिनेश निकाळजे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, नाना दळवी, विनोद केदारे, राजेंद्र तरटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

त्यानंतर नगर तालुक्यातील खडकी गावात त्यांनी कांदा, दुधाच्या प्रशासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकरी हिताची आक्रमक भूमिका काँग्रेस घेईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी व्हॉईस चेअरमन संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, लेबर फेडरेशनचे जयंत वाघ, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण म्हस्के, खडकीचे राहुल बहिरट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील सोसायटीच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास त्यांनी हजेरी लावली. 

अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच नगर शहरात लोकसभेची आढावा बैठक पार पडली होती. यावेळी दक्षिणेच्या लोकसभेसह नगर शहर विधानसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा ठोकला होता. खासदारकीला बाळासाहेब थोरात आणि नगर शहरातून विधानसभेला किरण काळे यांना उमेदवारी देण्याची यावेळी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी हंडोरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर थोरात यांचा नगर शहरासह, नगर व श्रीगोंदा तालुक्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारी बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

Post a Comment

0 Comments