Subscribe Us

Header Ads

आदिवासी समाज संघटनेच्या अक्षय भोसलेंचा कार्यकर्त्यांच्या समवेत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेशआदिवासी समाज संघटनेच्या अक्षय भोसलेंचा कार्यकर्त्यांच्या समवेत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश  

प्रतिनिधी : आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणाऱ्या अक्षय भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर (@Nagar) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जावेद भोसले, अजय भोसले, निलेश भोसले, मयूर चव्हाण, दिनेश भोसले, वैभव भोसले आदींसह युवकांनी मोठया संख्येने यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. 

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरासह जिल्ह्यातील एसटी प्रवर्गात मोडणाऱ्या समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्याचे काम शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात करणार असल्याचे प्रवेशानंतर बोलताना अक्षय भोसले यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष काळेंसह मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, रेव्ह. अनिल नेटके, प्रताप शेळके पाटील, संपतराव म्हस्के, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील क्षेत्रे, उषाताई भगत राणीताई पंडित, सुनिता भाकरे, जरीना पठाण, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, चंद्रकांत उजागरे, रोहिदास भालेराव, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, फैयाज शेख, मयूर भिंगारदिवे, किशोर कोतकर, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अरुण मस्के, जयंत वाघ, ॲड. माणिक मोरे, शरद गुंजाळ, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे, विश्वनाथ निर्वाण, अजित वाडेकर, सत्यशील शिंदे, ललित कांबळे, प्रशांत थोरात, अन्वर शेख, सचिन शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments