Subscribe Us

Header Ads

हज़रत सय्यद पिर पठारशाह वली दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न



हज़रत सय्यद पिर पठारशाह वली दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न 

सर्व धर्मीयांची उपस्थिती हे धार्मिक एकोप्याचे उत्तम उदाहरण : किरण काळे

प्रतिनिधि : धरती चौक येथील हज़रत सय्यद पिर पठारशाह वली दर्ग्याचा संदल उरूस मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करण्यात आली. भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. परिसरासह शहराच्या विविध भागातून आलेल्या सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने असणारी उपस्थिती हे शहरात असणाऱ्या धार्मिक एकोप्याचे उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना किरण काळे यांनी केले. 

हज़रत सय्यद पिर पठारशाह वली दर्गा कमिटीचे समीर मुन्शी, अमीर सय्यद, बबलू रंगरेज, यूनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. किरण काळे यांच्या हस्ते यावेळी भंडा-याचे वाटप करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, चंद्रकांत उजागरे, अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले, 

हज़रत पिर पठारशाह वली दर्ग्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दर्ग्याबद्दल असणारी अख्यायिका सर्वश्रुत आहे. दररोज भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतात. विशेष म्हणजे मुस्लिम, हिंदू बांधवांसह परिसरातील सर्व धर्मीय बांधव देखील या दर्ग्याशी जोडले गेलेले आहेत. अशाच प्रकारचा सामाजिक, धार्मिक एकोपा कायम राहिल्यास आपापसातील बंधुभाव वृध्दींगत होईल. 

समीर मुन्शी म्हणाले, 

दरवर्षी दर्ग्याच्या वतीने संदल उरुसाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने भंडारा आयोजित केला जातो. या भंडाऱ्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविक घेतात. याही वर्षी परिसरासह शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उरुसामध्ये सहभाग नोंदवला आहे. 

अलतमश जरीवाला म्हणाले, 

दर्ग्याची आयोजन समिती उरुसाची जोरदार तयारी करत असते. उत्तम नियोजनामुळे याही वर्षीचा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला आहे. शांतता, सलोखा, आपापसातील बंधुभाव ही काळाची गरज आहे. पुढील काळात देखील आयोजन समितीला विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. 

उरुसाच्या यशस्वी आयोजनासाठी सद्दाम कुर्रेशी, अहमद सय्यद, फरहान शेख, नवेद बावा, फयाज़ तांबोली, हुसैन मणियार, नौशाद बंगाली, एलताज़ खान, रिज़वान जरीवाला, वसीम तांबोळी, जफर सय्यद, अजर बागवान, वसीम शेख, फैसल बागवान, फरहान शेख, हनीफ शेख, अरशान बागवान, शेख तौफ़ील, परवेज़ शेख, हन्नान सय्यद, शरीफ सय्यद, शहीद शेख, अयान शेख, रेहान शेख, मजीद सय्यद, आतिफ सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments