Subscribe Us

Header Ads

Indian History : काळे म्हणाले, क्रांतिकारकांना घडविणारा वस्ताद म्हणून "त्यांची" ओळख.. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या पूर्वजांचा केला होता गौरव


अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांनी केलेले कार्य महान आहे. क्रांतिकारकांना घडविणारा वस्ताद म्हणून त्यांची ओळख आहे. ते युद्धकलेत पारंगत होते. पराक्रमी होते. साळवे यांचे सबंध कुटुंब धाडसी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांच्या पूर्वजांनी पराक्रम केल्याची इतिहासात नोंद आहे. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळेच महाराजांनी त्यांना विशेष पदवी दिली होती. आजही लहूजी यांचा जीवनपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. 

लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याही लालटाकी येथील पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

दशरथ शिंदे, विलास उबाळे, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, गणेश आपरे, उषाताई भगत, आकाश अल्हाट, रियाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, मुस्तफा खान, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, बाबासाहेब वैरागर, सुधीर लांडगे, सोफियान रंगरेज, समीर शेख, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अशोक जावळे आदींसह कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments