भाजप तरुण पिढीसमोर खोटा इतिहास मांडण्याचा विकृत प्रयत्न करत आहे : किरण काळे
प्रतिनिधी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आयर्न लेडी इंदिरा गांधी ही देशाला लाभलेली दोन महान रत्न आहेत. या दोन रत्नांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वामुळेच भारत आज जगात सक्षम राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभा असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. जयंती दिनानिमित्त लालटाकी येथील नेहरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
काळे म्हणाले,
भाजप हे पं. नेहरू, इंदिरा गांधी यांनी केलेल्या दैदिप्यमान कार्याची माहिती पुसून टाकण्यासाठी सातत्याने खोटा इतिहास मांडत खोटी माहिती समाजामध्ये पसरवण्याचे काम करत आहे. तरूण पिढीची दिशाभूल यातून केली जात आहे. हा त्यांचा विकृत प्रयत्न आहे. मात्र वास्तव कुणी नाकारू शकत नाही. या दोन्ही नेत्यांच्या कार्याची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची चळवळ हीच काँग्रेसची सर्वात मोठी चळवळ होती. या काळात भाजपचा जन्मही झालेला नव्हता. मात्र इतिहासाची तोडमोड करून तो तरुण पिढीला सांगितला जात आहे. ही मानसिकता विकृतीचे दर्शन घडविणारी आहे. जयंती सप्ताहाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्ते याचा पर्दाफाश करतील.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त लालटाकी येथील पुतळ्याला शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
१४ नोव्हेंबर हा पं.नेहरू यांचा जयंती दिन व बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती असते. काँग्रेसच्या या दोन्ही दिवंगत नेत्यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेहरू, गांधी जयंती सप्ताहाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने या दोन नेत्यांनी राष्ट्रभरणीसाठी केलेल्या कार्याची माहिती काँग्रेस कार्यकर्ते समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दशरथ शिंदे, विलास उबाळे, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, गणेश आपरे, उषाताई भगत, आकाश अल्हाट, रियाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, मुस्तफा खान, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, बाबासाहेब वैरागर, सुधीर लांडगे, सोफियान रंगरेज, समीर शेख, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अशोक जावळे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments