Subscribe Us

Header Ads

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुसद्दीक मेमन यांचा शहर काँग्रेसमध्ये प्रवेश


प्रतिनिधी : अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक कासम मेमन यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर त्यांनी पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच मेमन यांनी राष्ट्रवादीतील आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते काँग्रेसवासी झाले आहेत. 

यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते. 

मेमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. आ.जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर राष्ट्रवादीने शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. अहमदनगर युवा फाउंडेशन ट्रस्टचेते सचिव आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे देखील ते शहराध्यक्ष आहेत. 

प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेमन म्हणाले, देशात संविधान धोक्यात आले आहे की काय अशी भावना जनतेचे झाली आहे. काँग्रेस संविधान वाचविण्याची लढाई देशभर लढत आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरात मी काम करणार असून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. 

अहमदनगर कॉंग्रेसचे नेते राहिलेल्या दिवंगत कासमभाई मेमन यांचे मुसद्दीक मेमन हे चिरंजीव आहेत. कासमभाई नेहमी गोर-गरीबांच्या न्याय हक्कासाठी लढायचे. कासमभाई यांचा सामाजिक वारसा पुढे नेत मुसद्दीक मेमन आज काम करत आहेत. 

Post a Comment

0 Comments