प्रतिनिधी : राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिष्टचिंतन केले. थोरात हे महाराष्ट्रातील अत्यंत संयमी, सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन असणारे आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे सक्षमपणे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि सहकारी पक्षांना निश्चित घवघवीत महाराष्ट्रात यश मिळणार आहे. तशी जनभावना निर्माण झाली आहे. थोरात यांना मुख्यमंत्री पदासाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देत असल्याचे प्रतिपादन यावेळी किरण काळे यांनी केले.
यावेळी अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
किरण काळे म्हणाले, सलग नॉट आउट आठ वेळा आमदार होण्याचा विक्रम थोरात यांच्या नावावर आहे. आजमितीस महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ते सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. सध्या राजकारणातील नीतिमत्ता संपली आहे की काय अशी जनभावना निर्माण झाली आहे. रोज लोकशाहीवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना राज्यात, देशात घडत आहेत.
काँग्रेस ज्या ज्या वेळी संकटात होती त्या त्या वेळी बाजीप्रभू देशपांडे होत थोरात यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची खिंड लढवली. काँग्रेसला बळकट करण्याचं काम केलं. महाविकास आघाडीची २०२४ मध्ये सत्ता निश्चितपणे येणार आहे. लोक हुकुमशाहीला आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस सह सहकारी पक्षांची सत्ता येत असताना बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे यावेळी काळे म्हणाले.
0 Comments