राजकीय दबावातून निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचा काँग्रेसचा आरोप
कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा घडले हाय व्होल्टेज नाट्य.. झाली जोरदार खडाजंगी
प्रतिनिधी : कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा हाय व्होल्टेज नाट्य पाहायला मिळाले. महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यावर शहरातील एका खाजगी हॉटेलवर धाड मारून ताब्यात घेण्यात आले होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या समवेत केडगाव उपनगर प्रचार दौऱ्यात होते.
काळे यांना ही घटना समजताच काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन आवरत जमले होते.
यावेळी शहराचे डीवायएसपी अमोल भारती आणि किरण काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी भारती यांनी काळे यांना अटक करा असे फर्मान सोडले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते संतापले.
काळे यांनी कोतवाली पोलीस निरीक्षकांच्या दालनातच जमिनीवर बैठक मांडून मी कोणताही गुन्हा केलेला नाही. पण खोटा गुन्हा दाखल करून जर मला अटक करायची असेल तर मी त्या संघर्षाला सामोरे जायला तयार आहे. मात्र हे हुकूमशाही वागणे संविधान विरोधी आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे म्हणत डीवायएसपी भारती यांना चांगलेच धारेवर धरले.
त्यानंतर प्रतिक्रिया देताना किरण काळे काय म्हणाले ऐकूयात.
Video
0 Comments