उड्डाणपुलावरील आतिषबाजीचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला "या" हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून आनंद
अ-नगर प्राईड न्यूज टीम : नगर शहरातील पहिल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी लेझर शो आणि आतिषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. आसमंत यावेळी वेगवेगळ्या रंगांनी नटून गेला होता. डोळ्याचे पारणे फिटावे असे देखणे रूप नगरकर डोळ्यात साठवत होत.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या आतिषबाजीचा आनंद लुटला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या अरुणोदय हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून विखे पाटील यांनी आतिषबाजी पाहणे पसंत केले.
शहरातील नागरिकांनी देखील सक्कर चौकापासून ते स्टेट बँक चौकापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी केली होती. नगरकरांनी देखील या लेझर शो व आतिषबाजीचा आनंद यावेळी लुटला.
0 Comments