गडकरींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी, राज्यपालांची जीभ पुन्हा घसरली - राज्यभरातून संताप
अ.नगर प्राईड वेब न्यूज टीम (औरंगाबाद) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद स्वीकारल्यापासून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अजूनही काही थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. शनिवारी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे नवे वादरंग निर्माण झाले आहे.
शिवराय प्रेमींकडून राज्यपाल कोशारी यांचा निषेध होत असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे जेष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डिलीट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशारी बोलत होते.
यावेळी बोलताना भगतसिंग कोशारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, अस विधान करून कोशारी यांनी वादाला फोडणी दिली आहे.
ते म्हणाले की, तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत ? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. "शिवाजी तर जुन्या काळातले आहेत" असा एकेरी उल्लेख त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला.
पुढे ते म्हणाले की, मी नव्या युगा विषयी बोलतोय. डॉ. आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला इथेच ते मिळतील, असे कोशारी म्हणालेत. कोशारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे.
0 Comments