Subscribe Us

Header Ads

भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य...

भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य...

अ-नगर प्राईड न्यूज टीम : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीला एका डिबेटमध्ये सहभागी झाले असता जीभ घसरली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे महाराष्ट्रातून भाजप प्रवक्त्याचा विविध स्तरातून तीव्र निषेध होत आहे.

आज तक वृत्तवाहिनीवर एका डिबेटमध्ये सहभागी झाले असता सुधांशू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्या वरून सध्या वादंग सुरू आहे. सुधांशू यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या विषयी नेमक काय म्हटल आहे हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. 


Video Source : Aaj Tak

दरम्यान, जोपर्यंत सुधांशू त्रिवेदी जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष ज्यामध्ये सुधांशू त्रिवेदी उपस्थित असतील त्या कोणत्याही चर्चेत भाग घेणार नाही , अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी जाहीर केली आहे. 

Post a Comment

0 Comments