Subscribe Us

Header Ads

ट्वेन्टी-२० अपडेट - आज रंगणार इंग्लंड, श्रीलंकेत रोमहर्षक सामना



अ - प्राईड वेबन्यूज टीम : सिडनीच्या भव्य मैदानावर शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा रोमहर्षक साखळी सामना रंगणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. गट १ मधून उपांत्य फेरी कोणता दुसरा संघ गाठणार हे या सामन्याच्या निकालावरून निश्चित होणार आहे. श्रीलंका बाजी मारणार की इंग्लंड यश मिळवणार यावरून उपांत्य फेरीत यापैकी कोणत्या संघाला स्थान मिळणार हे ठरणार आहे. 

ऑस्ट्रेलियाला आगेकूच करायची असेल तर श्रीलंका हा सामना जिंकायला हवी. मात्र इंग्लंडने विजय मिळवल्यास उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात इंग्लंड यशस्वी होईल.  यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचे भवितव्य हे आता श्रीलंकेच्या हातात आहे. गट १ मध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे सात गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान वर विजय मिळवत आपले स्थान निश्चित केले आहे. न्युझीलँड अग्रस्थानी असून न्युझीलँडची गुणसंख्या देखील सात आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघांची गुणसंख्या समान असली तरी न्युझीलँडची निव्वळ धावगती ही सर्वोत्तम असल्याने त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश यापूर्वीच निश्चित झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा पहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments