Subscribe Us

Header Ads

तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले तर नाही ना ? दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतो गंभीर धोका

अ - प्राईड वेबन्यूज टीम : कोलेस्ट्रॉल ही शरीरात तयार होणारी एक विशिष्ट प्रकारची अनावश्यक चरबी आहे. ही रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण करते. उच्च कोलेस्ट्रॉल ही सध्या जगभरात मोठी गंभीर समस्या बनत चालली आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची मोठी शक्यता निर्माण होते.  यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. 


त्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडू शकते. व्यायामाचा अभाव आणि असमतोल आहार यामुळे कोलेस्ट्रॉल हा घटक शरीरात वाढतो तो वाढू नये यासाठी समतोल आहार आणि नियमित व्यायाम केल्यास या धोक्यापासून बचाव करता येऊ शकतो. जंक पुढचा अतिरिक्त समावेश यामुळे सदस्य जीवनशैली मध्ये अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे जंक फूड हे भारतीय खाद्य संस्कृती नाही ती टाळ्यास हृदयविकाराच्या शक्यतेपासून दूर राहणे शक्य आहे. 

पुढील लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा : 

छातीत दुखणे

हात पाय जड पडणे

अस्वस्थ  वाटणे

बैचेनी वाटणे

थकवा जाणवणे

श्वास घेण्यास अडचण वाटणे

कोलेस्ट्रॉलवर घरगुती सोपे उपाय

मेथी

मेथीच्या दाण्यांमध्ये औषधी गुणधर्म  आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यात मधुमेहविरोधी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात.

लिंबू

लिंबाचा रस नियमित प्यायल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.  लिंबात असलेल्या आम्ल गुणधर्माचा शरिराला फायदा होतो. 

कांद्याचा रस

कांद्याचा रस केवळ कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करते. रक्त शुद्ध करुन हृदयाचं आरोग्यही चांगलं ठेवते.

Post a Comment

0 Comments