अ - प्राईड वेबन्यूज टीम : राज्यात शिंदे सेना - भाजप आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या शिंदे गटाने राज्यात संघटनात्मक बांधण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी चालवली आहे. न्यायालय आणि निवडणूक आयोगात अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. भाजप देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत संघटनात्मक बांधणीसाठी जोर लावत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुढील तीन दिवस मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड असणाऱ्या ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत.
ठाणे, भिवंडी, मीरा - भाईंदर या भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका ते घेणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध समाजांचे नेते यांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या घरी देखील त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी ते ठाणे शहरात असणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बूथ वॉरियर्सशी ते संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी यादव याचे नियोजन केले आहे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या बड्या नेत्याचा यानिमित्ताने पहिल्यांदाच दौरा होत असल्यामुळे अनेकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
0 Comments