उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी वादावादी आणि मारामाऱ्या.. चार चाकी गाडीला अपघात झाल्याची ही माहिती....
अ- नगर प्राईड वेब न्यूज टीम : बहुचर्चित उड्डाणपुराचे काल लोकार्पण झाले. नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल प्रत्यक्षात उतरला. नगर दक्षिणचे खासदार आणि नगर शहराचे आमदार यांचे देशाच्या रस्ते वाहतूक मंत्र्यांनी भरभरून कौतुक देखील केले. उड्डाणपुलाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद देखील नगरकरांनी साजरा केला. जोरदार आतिषबाजी झाली. ती पाहण्यासाठी नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
आज सकाळपासून उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र खुला झाल्याच्या पहिल्या दिवशीच उड्डाणपूलावरच वादावादी आणि मारामारीची घटना घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चर्चेचा विषय झाला आहे.
Video खाली पहा
दरम्यान, एका चार चाकी वाहनाला देखील उड्डाणपुलावर अपघात झाल्याची पोस्ट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या फेसबुकवर टाकली आहे. हा अपघात नगरच्या उड्डाण पुलावरील आहे की नाही याची पुष्टी अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम करीत नाही. मात्र या अपघाताचा फोटो समोर आला असून हा फोटो नगरच्या उड्डाणपूलावरील असावा असे साधर्म्य या फोटोमध्ये दिसत आहे.
0 Comments